संसदेत विरोधकांच्या गोंधळात रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके पारित झाली आहेत. याविधेयकाविरोधात विरोधीपक्षांकडून निषधे नोंदवण्यात येत आहे.
राज्यसभेच्या आठ खासदारांचे निलंबन; गदारोळानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब - राज्यसभा खासदार निलंबन
14:30 September 21
14:12 September 21
सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, आठ खासदारांना निलंबीत करण्यात आले आहे. निलंबीत करण्यात आठ खासदारांमध्ये डेरेक ओ ब्रायन (तृणमूल काँग्रेस), संजय सिंह (आप), राजीव साटव (काँग्रेस), के.के. रागेश (सीपीएम), सैयद नासिर हुसैन (काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), एलामरम करीम (सीपीएम) यांचा समावेश आहे.
12:07 September 21
राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
निलंबित खासदारांना वारंवार सांगूनही त्यांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्यामुळे, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
11:21 September 21
राज्यसभेचे कामकाज पु्न्हा एकदा बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
10:40 September 21
राज्यसभेचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब
विरोधकांचा गदारोळ सुरू राहिल्यामुळे राज्यसभेचे कामकाज पुन्हा ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
10:07 September 21
राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात; मात्र गोंधळामुळे पुन्हा तहकूब
दहा वाजता राज्यसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरूवात करण्यात आली. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरुच असल्यामुळे पुन्हा अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले आहे. राज्यसभेतील निलंबीत खासदारांना सभागृहात थांबण्याचा अधिकार नाही. ते सभागृहात असताना कामकाज सुरू करता येणार नाही, असे राज्यसभा खासदार व्ही. मुरलीधरण यांनी म्हटले आहे.
09:46 September 21
राज्यसभेचे कामकाज दहा वाजेपर्यंत स्थगित
आठ खासदारांना निलंबित केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दहा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
09:38 September 21
राज्यसभेच्या आठ खासदारांचे निलंबन; राज्याच्या राजीव सातवांचाही समावेश
नवी दिल्ली :सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, आठ खासदारांना निलंबीत करण्यात आले आहे. या खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबीत करण्यात आल्याची घोषणा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी केली. या आठ खासदारांमध्ये काँग्रेसच्या राजीव सातवांचाही समावेश आहे.
रविवारी पारित झालेल्या शेतकरी विधेयकांचा विरोध करताना राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला होता. "राज्यसभेसाठी कालचा दिवस फार वाईट होता. उपसभापतींसोबत येथील खासदारांनी गैरवर्तन केले होते. हे अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे" असे मत आज सभापती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. याबाबत कारवाई करत त्यांनी डेरेक ओब्रायन, संजय सिंह, राजीव सातव, के.के. रागेश, रिपून बोरा, डोला सेन, यईद नाझीर हुसैन आणि एलामारण करीम या खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबीत केले.
उपसभापतींवरील अविश्वासदर्शक ठराव नियमबाह्य..
विरोधकांचा विरोध असतानाही, आवाजी मतदानाच्या जोरावर उपसभापतींनी रविवारी शेतकरी विधेयके पारित केली होती. त्यामुळे, आज त्यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा विचार विरोधक करत होते. मात्र, असे करणे हे नियमबाह्य असल्याचे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंनी स्पष्ट केले.