महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर - अनलॉक न्यूज

कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता 15 ऑक्टोबरनंतर केंद्र सरकारने राज्यांना शाळा आणि कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

school
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 5, 2020, 10:22 PM IST

Updated : Oct 5, 2020, 10:37 PM IST

नवी दिल्ली - राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरु करण्याबाबतची कार्यप्रणाली (SOP) हे राज्यांनी ठरवायचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही राज्यांची, शाळांची जबाबदारी आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -'दलित अत्याचाराच्या प्रश्नांवर मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये'

शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरीही हा निर्णय सक्तीचा नाही. राज्यातील परिस्थितीनुसार राज्य याबाबत निर्णय घेऊ शकतात. शाळा सुरू झाल्यानंतर किमान २ ते ३ आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये. मुलांचे मनःस्वास्थ योग् राहिल याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शाळांनाही स्वच्छता आणि कोविड सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या गाइडलाइननुसार -

जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची आहे

पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात

विद्यार्थ्यांना रोज हजर रहावेच लागेल असे नाही. त्यासाठी हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे

विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळांनी राज्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक

शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना तसेच त्याचे वाटप करण्यात येताना पूर्ण खबरदारी घेतली जावी

Last Updated : Oct 5, 2020, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details