नवी दिल्ली -पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी नीरव मोदीविरोधात ईडीने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए कायद्यातंर्गत हे आरोपपत्र दाखल केले आहे.
नीरव मोदी विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल - PNB
आणखी पुरावे आल्यामुळे आम्ही पुरवणी आरोपपत्र दाखल केले असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकताच नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने ही कारवाई केली आहे. 'द टेलिग्राफ' वृत्तपत्राने नीरव मोदीचा हा व्हिडिओ शेअर केला होता. आणखी पुरावे आल्यामुळे आम्ही पुरवणी आरोपपत्र दाखल केले असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला नीरव मोदीच्या वास्तव्याविषयी माहिती असून आम्ही त्याच्या प्रत्यर्पणाबाबत प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले होते. जुलै २०१८मध्ये इंग्लंड सरकारला याबाबत विनंती करण्यात आली आहे. यावर त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.