महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नोटंबदी व जीएसटी सारख्या चुकीच्या निर्णयांमुळे देश मंदीच्या गर्तेत सापडला - मनमोहन सिंह

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून भाजप सरकारवर टीका केली आहे.

मनमोहन सिंह

By

Published : Sep 1, 2019, 3:28 PM IST

दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून भाजप सरकारवर टीका केली. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट झाली आहे. देशाचा आर्थिक विकासदर ५ टक्क्यांपर्यंत खाली येण म्हणजे आपण मंदीच्या गर्तेत असल्याच चिन्ह आहे, असे मनमोहन सिंह म्हणाले. नोदबंदी आणि जीएसटी सारख्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याचे सिंह म्हणाले.

हेही वाचा - दिग्विजय सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; 'भाजप-बजरंग दल आयएसआयकडून पैसे घेते'

आपल्या अर्थव्यवस्थेत उभारी घेण्याची क्षमता आहे, मात्र, मोदींच्या ढिसाळ कारभारामुळे देशावर मंदीचे सावट आले आहे, असे सिंह म्हणाले. मागच्या तिमाहीमध्ये देशाचा विकासदर ५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ ०.६ टक्क्यापर्यंत घसरण ही खूप चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. देशांतर्गत विक्री आणि महसूली उत्पन्न घटले आहे, आणि गुंणतवणुकदारांमध्ये उदासिनता पसरल्याचं सिहं म्हणाले.

हेही वाचा - स्वीस बँकेतील काळा पैसा बाहेर येणार; खातेधारकांची गोपनीय माहिती मिळणार भारताला

नव्याने रोजगार निर्मिती होत नसल्यावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. वाहन क्षेत्रातील ३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर असंघटीत क्षेत्रामध्येही लोकांच्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जात आहेत. ग्रामीण भागाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही, अशी टीका मनमोहन सिंह यांनी सरकारवर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details