महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकपासून तयार केल्या विटा - प्लास्टिकच्या बाटल्यांपासून विटा

पश्चिम बंगालच्या विष्णुपूर गावामध्ये प्लास्टिक बाटल्या आणि सिंगल यूज प्लास्टिकपासून चक्क विटा तयार केल्या आहेत.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक
नो टू सिंगल यूज प्लास्टिक

By

Published : Jan 30, 2020, 8:34 PM IST

कोलकाता -प्लास्टिकच्या बाटल्यांपासून विविध गोष्टी बनवता येऊ शकतात, याबाबत तुम्हाला माहितीच असेल. मात्र, याच प्लास्टिक बाटल्या आणि सिंगल यूज प्लास्टिकपासून चक्क विटाही तयार होऊ शकतात, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल..? पश्चिम बंगालच्या विष्णुपूर गावामध्ये हाच प्रयोग सुरू आहे.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकपासून तयार केल्या विटा
या उपक्रमाची संकल्पना सर्वप्रथम बनकुरा जिल्ह्यातील विष्णुपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मांडली होती. मानस मंडल या अधिकाऱ्याने सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून, त्यांचा विटांप्रमाणे वापर करण्याचा प्रयत्न केला. या बाटल्यांमध्ये प्लास्टिक भरल्यामुळे, त्या पूर्ण भरीव झाल्या आणि त्यांचा विटांप्रमाणे वापर करणे त्यांना शक्य झाले. मंडल यांनी आपल्या मुलालाही या कामामध्ये सहभागी करून घेतले आहे. हा प्रयोग यशस्वी होतो आहे, असे समजताच, मंडल यांनी तो मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details