महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशातील ५ मतदान केंद्रांवर होणार पुन्हा मतदान - eci

या ३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केल्यानंतर पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. येथील मतदान केंद्रांवर हिंसा, व्होटींग मशीन्समधील बिघाड, इतर काही कारणांनी मतदार मोकळेपणाने मतदान करू न शकणे, योग्य पद्धतीने मतदान होणे आदी कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश

By

Published : May 2, 2019, 3:00 PM IST

अमरावती - भारतीय निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशातील ५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुंटूर, प्रकाशम आणि नेल्लोर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ६ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. काल (१ मे) दिलेल्या पत्रात आयोगाने हे निर्देश दिले आहेत.


'मतदान घेऊन परत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल, निरीक्षकांचे अहवाल आणि मतदान केंद्रांवर घडलेल्या घटना विचारात घेतल्यानंतर निवडणूक आयोग ही बाब जाहीर करत आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील सेक्शन ५८ मधील सब-सेक्शन (२) (अ) याच्या आधारे हा निर्णय घेण्यात येत आहे. ११ एप्रिलला मतदान झालेल्या मतदान केंद्रावर ६ मे रोजी पुन्हा नव्याने मतदान घेण्यात येणार आहे,' असे या पत्रात म्हटले आहे.


या ३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केल्यानंतर पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील मतदान केंद्रांवर हिंसा, व्होटींग मशीन्समधील बिघाड, इतर काही कारणांनी मतदार मोकळेपणाने मतदान करू न शकणे, योग्य पद्धतीने मतदान होणे आदी कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


आंध्र प्रदेशात १७५ विधानसभा आणि २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. २३ मे रोजी मतमोजणी होईल.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details