नवी दिल्ली -निवडणूक आयोगाने बिहारमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीतील प्रत्येक पक्षाच्या व उमेदवारांच्या खर्चावर बारीक नजर ठेवण्यासाठी 'विशेष खर्च निरीक्षकां'ची नेमणूक केली आहे. या पदावर भारतीय महसूल सेवेच्या (IRS) सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मधू महाजन आणि बी. आर. बालाकृष्णन अशी या विशेष खर्च निरीक्षकांचे नावे आहेत.
मधू महाजन हे १९८२ च्या आयआरएस बॅचचे असून बी. आर. बालाकृष्णन हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. हे विशेष खर्च निरीक्षक बिहार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया आणि या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधन सामुग्रीवर नजर ठेवण्याचे काम करणार आहेत.