नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने संबळपूर येथे एका अधिकाऱ्याला निलंबित केले. या अधिकाऱ्याने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर तपासण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान मोदी प्रचार सभेसाठी संबळला आल्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर तपासण्यात आले.
पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर तपासणारा निवडणूक अधिकारी निलंबित - suspend
या अधिकाऱ्याला २२ मार्चला विशेष संरक्षण दलाकडून संरक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींवर कारवाई न करण्याच्या तसेच, त्यांना तपासणीतून मुक्तता देण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या, असे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका व्यक्तीचे पथक ओडिशाला पाठविले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोहम्मद मोहसिन या कर्नाटक कॅडरच्या आयएएस अधिकाऱ्याची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने योग्य प्रकारे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन केले नाही. पंतप्रधानांसारख्या विशेष संरक्षण दलाकडून संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीबाबत ही अपवादात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईविषयी पंतप्रधान मोदींकडून तक्रार करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे या निवडणूक अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली. या अधिकाऱ्याला २२ मार्चला विशेष संरक्षण दलाकडून संरक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींवर कारवाई न करण्याच्या तसेच, त्यांना तपासणीतून मुक्तता देण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या, असे आयोगाने म्हटले आहे.