महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रमजान व उष्णतेच्या लाटेमुळे मतदान प्रक्रियेत बदल नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

प्रशासनाच्या समस्यांचा विचार करता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानाची वेळ बदलता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारतीय निवडणूक आयोग

By

Published : May 6, 2019, 12:16 PM IST

नवी दिल्ली - रमजान आणि उष्णतेच्या लाटेमुळे मतदानाच्या वेळेत बदल करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २ मे रोजी निवडणूक आयोगाला यासंदर्भातील निर्णय घेण्यास सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले असून उर्वरित ३ टप्प्यांमधील मतदानाच्या काळातच मुस्लीम समाजाचा रमजानचा महिना सुरू होत आहे. तेव्हा तीन टप्प्यांमधील मतदान सकाळी सातऐवजी पहाटे ५ वाजल्यापासून सुरु करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान तसेच इतर अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी का?, यासंदर्भातही निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

प्रशासनाच्या समस्यांचा विचार करता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानाची वेळ बदलता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ७ राज्यांमधील ५१ जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details