मुक्तो - सर्व अडथळ्यांवर मात करत निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी १३ हजार ५८३ फूट उंचीवर चढाई केली. ही चढाई कोणता विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नसून अरुणाचल प्रदेशात निवडणुका घेण्यासाठी त्यांना करावी लागली. मुक्तो विधानसभा मतदार संघात इतक्या उंचावर असलेले लुगुथंग हे गाव आहे.
अरुणाचल प्रदेशातील ६० विधानसभा मतदारसंघ आणि २ लोकसभा मतदारसंघांसाठी ११ एप्रिलला निवडणूक झाली. 'अरुणाचल प्रदेशातील निवडणुकांसाठी आम्हाला विविध अडथळे आणि आव्हाने पार करावी लागली. त्यात १३ हजार ५८३ फूट उंचीवर असेलल्या लुगुथंग या गावाचाही समावेश आहे. मतदारांसाठी आम्ही ही चढाई केली. येथील निवडणुकांसाठी आम्ही शक्य ते सर्व केले,' असे ट्विट निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शेफाली शरण यांनी शनिवारी केले आहे.