कानपूर -उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तींनी 16 वर्षीय मुस्लीम मुलाला मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना शुक्रवारी घडली आहे. मोहम्मद ताज, असे त्या तरुणाचे नाव आहे.
धक्कादायक! 'जय श्रीराम' म्हणण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तींकडून अल्पवयीन मुलास मारहाण - Manoj Kumar Gupta
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तींनी 16 वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
किदवई नगर येथे नमाज पठण करून मोहम्मद ताज आपल्या बर्रा येथील घरी येत होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्याला थांबवून त्यांच्या डोक्यावरची टोपी काढली. त्याला जय श्री राम म्हणायला सांगितले. त्याने नकार दिल्यावर त्याला हल्लेखोरांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची माहिती सतीश कुमार सिंह यांनी दिली आहे.
या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यापुर्वी ही 'जय श्रीराम' न म्हटल्याने एका तरुणाला ट्रेनमधून ढकलून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.