महाराष्ट्र

maharashtra

'ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, एका क्षणात डागणार लक्ष

By

Published : Sep 30, 2019, 2:19 PM IST

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिसातील चांदीपूर रेंजमध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

'ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज

नवी दिल्ली - भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिसातील चांदीपूर रेंजमध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता अचूक आहे.


येत्या काही दिवसांमध्ये भारत-रशिया मिळून या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किलोमीटरवरून ६०० किलोमीटर वाढवण्यावर काम करणार आहे. कोणतेही लक्ष्य एका क्षणात हे क्षेपणास्त्र गाठू शकते. याचबरोबर हे क्षेपणास्त्र जमीन, हवा आणि पाणी तिनही ठिकाणाहून डागता येऊ शकते. ब्रह्मोस सारखं क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तान यांच्याकडेदेखील नाही.


ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज या क्षेपणास्त्राचे नाव ब्रह्मपुत्रा आणि रशियामधील मस्कावा नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किलोमीटर आहे. तर याचे वजन २.५ टन एवढे आहे. या क्षेपणास्त्राची हवाई चाचणी सतत चालू आहे. हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानाकडून अनेक यशस्वी घेण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details