चैन्नई - द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहणे हा देशद्रोह कसा असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
देशात धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याने देशद्रोह कसा होऊ शकतो. गुहा, मणिरत्नम आणि इतर मान्यवरांना देशद्रोही कसे म्हणू शकतो. अशा गोष्टीमुळे आपण खरेच लोकशाही असलेल्या देशामध्ये राहतो का? असा प्रश्न आणि एक वेगळ्या प्रकराची भिती लोकांच्या मनात निर्माण होईल, असे एम. के. स्टालिन म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्यामध्ये मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता. त्या मान्यवरांविरूध्द मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात देशद्रोहाचा खटला वकील सुधीर ओझा यांनी दाखल केला आहे.