महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करा, मोदींनी विनंती केल्याचा ट्रम्प यांचा गौप्यस्फोट

इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मिर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. हा मुद्दा सोडवण्यासाठी मी काही मदत करु शकत असेन तर नक्कीच मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले. अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Jul 23, 2019, 8:58 AM IST

Updated : Jul 23, 2019, 1:58 PM IST

नवी दिल्ली -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी, विनंती केली. यावर ट्रम्प यांनी मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असे सांगितले.


एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी काश्मीर मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मिर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सांगितले. हा मुद्दा सोडवण्यासाठी मी काही मदत करु शकत असेन तर नक्कीच मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.


इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यामध्ये ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भाष्य केले. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसच्या प्रसिध्दीपत्रकात काश्मीर मुद्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

ट्रम्प यांना काश्मीर प्रकरणात मध्यस्थी करा, असे मोदींनी कधी सांगितले नाही - परराष्ट्र मंत्रालय


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिर प्रकरणात तोडगा काढण्याची विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. यावर मोदींनी ट्रम्पकडे अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत.


तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्विट करुन मोदींनी अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे सांगितले. काश्मिर प्रकरणात भारताला तिसऱ्या पक्षाची गरज नसून हा प्रश्न पाकिस्तानबरोबर चर्चा करुन सोडवला जाईल, अशा आशयाचे ट्विट रविश कुमार यांनी केले आहे.
पाकिस्तानला भारताशी चर्चा करावयाची असल्याल त्याने पहिले दहशतवाद संपवावा. त्यानंतर चर्चा करु असेही रविश कुमार यांनी सांगितले आहे.

काश्मिर प्रकरणी ट्रम्प यांचे वक्तव्य अपरिपक्व, दिशाभूल करणारे - अमेरिकेच्या काँग्रेस नेत्याची टीका


अमेरिकेचे काँग्रेस नेते यांनी ट्रम्प यांचे वक्तव्य अपरिपक्व आणि दिशाभूल करणार असल्याचे सांगितले. दक्षिण अशियामध्ये सगळ्यांना माहित आहे की, भारताला दुसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थी आवडणारी नाही. असे असतानाही ट्रम्प यांनी मध्यस्थीसाठी आवडेल असे सांगणे हे अपरिपक्वपणाचे लक्षण आहे. असे सेरमन म्हणाले.

Last Updated : Jul 23, 2019, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details