वॉशिंग्टन- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या भेटी दरम्यान पाकिस्तानला मदत देणे थांबवविल्याच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, पाकिस्तान विध्वंसक होऊन आमच्या विरोधात गेल्याने मदत थांबवल्याचे ट्रम्प म्हणाले.
साधारण दीड वर्षापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी १.३ दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली आहे. ट्रम्प यांच्या या व्यक्तव्यावरुन पाकसमोरील आर्थिक अडचण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने तसेच, विविध आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लागू झाल्याने जगभरातून आर्थिक मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.