नवी दिल्ली -२५ मेपासून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली होती. याबाबत कित्येक राज्यांनी आक्षेप घेतला होता, तर काहींनी आणखी मुदत मागितली होती. या सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतर, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक उद्यापासून (२५ मे) सुरू करण्यात येणार असल्याचे पुरी यांनी आज जाहीर केले आहे.
आंध्र प्रदेशमधील प्रवासी विमान वाहतूक २६ मेपासून, तर पश्चिम बंगालमधील २८ मेपासून सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक उद्यापासून सुरू होईल. तसेच, महाराष्ट्रातील इतर विमानतळांच्या एक तृतीयांश विमान वाहतूक मुंबईमधील विमानतळावरून करण्यात येणार आहे.