तिरुअंनतपुरम- अनेकजण घराचे संरक्षण करण्यासाठी कुत्रा पाळतात. मात्र. जर कधी कुत्रा चावणारा असेल किंवा जखमी, आजारी असेल तर लोकं वैतागून त्याला घराबाहेर सोडून देतात. मात्र, केरळमधील एका घरमालकानं कुत्र्याला घराबाहेर काढण्याचं अजबचं कारण पुढे आलयं. घराशेजारच्या कुत्र्यासोबत त्यांने पाळलेल्या कुत्रीचे अनैतिक संबध असल्यामुळं या मालकाने कुत्रीला चक्क घराबाहेर काढलं.
व्हाईट पोमेरियन जातीची ही ३ वर्षांची कुत्री असून घरमालकाने तिला तिरुअनंतपूरमधील चकाई परिसरातील वॉल मार्केट भागात बेवारसपणे सोडून दिलं.
या बेवारस कुत्रीला 'पीपल फॉर अॅनिमल' या संस्थेच्या स्वयंसेवका शामीन यांनी वाचवले. यावेळी कुत्रीच्या गळ्याला एक चिठ्ठी अडकवली होती. ती चिठ्ठी वाचून शामीन यांना धक्काच बसला.
ही कुत्री खूप चांगली असून तिची वागणूकही चांगली आहे. आम्ही तिला दुध, अंडी आणि बिस्कीट खायला घालतो, मात्र, तिला फार खायलाही लागत नाही. तिला कोणताही आजार नाही. तीन वर्षांमध्ये ती कोणालाही चावली नाही. तिला थोडे जास्त भुंकायची सवय आहे. मात्र, शेजारच्या कुत्र्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळं तिला सोडून देत आहे, असं या मालकानं चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.
'ती'चं शेजारच्या कुत्र्यासोबत जुळलं सूत, मग, मालकानं काढलं घराबाहेर जेव्हा मला ही कुत्री वॉल मार्केट गेट असल्याचे समजले तेव्हा मी तिला घरी आणले, असे शामीन यांनी सांगितलं. कुत्रा आजारी किंवा जखमी असल्यानं मालक सोडून देतात. मात्र, अनैतिक संबध असल्याने सोडून दिल्याचे मी प्रथमच पाहिल्याचे शामीन म्हणाल्या.