नवी दिल्ली - कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे. कोरोना विरोधातील लढाई लढताना आरोग्य कर्मचारी हेच खरे देवदूत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होईल, अशी भीती सोसायटीधारक आणि घरमालकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर बहिष्कार घातला जात आहे. त्यांना घर सोडण्याची धमकी दिली आहे. अशा घटनांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
लाजिरवाणं..! कोरोनाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर टाकला जातोय बहिष्कार - भारत बंद
देश कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकटात सापडला असताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर बहिष्कार टाकण ही अत्यंत चुकीची बाब आहे. उलट त्यांचा कामाला आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे.
दोनच दिवसांपूर्वी जनता कर्फ्यूच्या वेळी सायंकाळी ५ वाजता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा आपण सर्वांनी थाळ्या, टाळ्या आणि घंटानिनाद करत गौरव केला. त्यांच्या कामाचे कौतुक केले. आपला जीव धोक्यात घालून ते इतरांचा जीव वाचवत आहेत. मात्र, काहीजण त्यांना प्रोत्साहन द्यायचे सोडून त्रास देत आहेत. घरमालक आणि सोसायटीधारक आरोग्य कर्मचाऱ्यांवर बहिष्कार घालत आहेत. अशा घटना दिल्ली, नोयडा, वारंगळ, चेन्नईमधून समोर येत आहेत. त्यांना घर सोडण्याची धमकीही देत आहेत. त्यामुळे दु:खी झाल्याचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले.
देश कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकटात सापडला असताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर बहिष्कार टाकण ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. देशभरामध्ये कोरोनाचे जवळपास ५०० रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारे आणि केंद्र सरकारे मिळून या आपत्तीचा सामना करत आहेत. अनेक राज्यांनी आणि केंद्रशाशित प्रदेशांनी संचारबंदी लागू केली आहे.