नवी दिल्ली - डॉ. वीरेंद्र कुमार खटिक यांची १७ व्या लोकसभेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. टिकमगड येथून भाजप खासदार असलेले वीरेंद्र कुमार नियमित सभापतीची नियुक्ती होईपर्यंत लोकसभेचे कामकाज पाहणार आहेत.
डॉ. वीरेंद्र कुमार खटिक लोकसभेचे हंगामी सभापती - वरिष्ठ
दलित समुदायातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ साली त्यांनी अल्पसंख्यांक आणि महिला व बालविकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
सदनातील सर्वात वरिष्ठ सदस्याला हंगामी सभापती म्हणून निवडले जाते. नवीन निवडुन आलेल्या सदस्यांना सदनाची शपथ देण्याचे काम हंगामी अध्यक्ष करतो. नवीन नियमित सभापतीची नियुक्ती झाल्यानंतर हंगामी सभापतीचे काम संपुष्टात येते.
डॉ. वीरेंद्र कुमार खटिक सलग ७ वेळेस खासदार म्हणून निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार ४ वेळेस सागर मतदारसंघातून तर, ३ वेळेस टिकमगड येथून निवडून आले आहेत. दलित समुदायातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ साली त्यांनी अल्पसंख्यांक आणि महिला व बालविकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अर्थशास्त्र विषयातून पदव्यूत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केले आहे.