कोरोनापासून बचाव करण्यासाठी दर 90 मिनिटाला स्वच्छ करा तुमचा मोबाईल
कोरोना व्हायरसचे जंतू काच, मेटल आणि धातूच्या भांड्यावर जास्त काळ जिवंत राहू शकतात. त्यामुळे यापासून बनलेल्या वस्तू स्वच्छ करणं गरजेचं आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांकडून विविध उपाया बाबत चर्चा केली जात आहे. फरिदाबाद येथील फोर्टिस इस्कॉर्ट रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रवी शंकर झा यांनी आपला स्मार्टफोन दर 90 मिनिटाला सॅनिटायझरने स्वच्छ करून वापण्याचा सल्ला दिला आहे.
मोबाईल फोन वापरताना त्याचा संपर्क आपले डोळे, नाक, तोंड यांच्याशी येऊ नये म्हणून मोबाईल कव्हर किंवा ब्लू टूथ वापरावा, असेही ते म्हणाले आहेत.
एका संशोधनानुसार मोबाईल च्या स्क्रीनवर टॉयलेट सीटवर असणाऱ्या जंतुंच्या तीन पट जास्त जंतू असतात. 20 स्मार्टफोन युजर्स पैकी एकजण सहा महिन्यातून एकदा आपला स्मार्टफोन स्वच्छ करत असतो, असेही या संशोधनात समोर आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसातून एकदा तरी सॅनिटायझरने मोबाईलची स्क्रीन स्वच्छ करण्याचा सल्ला ज्योती मुत्ता यांनी दिला आहे. त्या दिल्ली येथील श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र मधील सीनिअर कन्सल्टंट आहेत.
तुम्ही ही प्रक्रिया दिवसातून एकदा करू शकता. तसचं दिवसभर मोबाईलवर काम केल्यानंतर संध्याकाळी देखील मोबाईल स्वच्छ करून ठेऊ शकता, असेही त्या म्हणाल्या. कोणाला श्वसनाशी संबधित काही समस्या असतील किंवा इतर कोणता आजार असेल, अशा व्यक्तींचा मोबाईल शक्यतोवर टाकावा. त्यामुळे आजार पसरणार नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा आजार साथीचा रोग असल्याचे जाहीर केले आहे. आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा यामुळे बळी गेला आहे. तर दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली येथील अपोलो रुग्णालयाचे सीनिअर कन्सल्टंट सुरनजीत चॅटर्जी यांनी सांगितले की, आपले हात वेळोवेळी स्वच्छ धुवावे. खोकताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी. या परिस्थितीत ही सवय लावणे अत्यंत गरजेचं आहे.
कोरोना व्हायरसचे जंतू काच,मेटल आणि धातूच्या भांड्यावर जास्त काळ जिवंत राहू शकतात. त्यामुळे यापासून बनलेल्या वस्तू स्वच्छ करणं गरजेचं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना कोणत्याही वयातील व्यक्तींना होऊ शकतो. मात्र, वयस्क आणि आधीच काही आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींवर याचा लवकर परिणाम होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.