पाटणा(बिहार)-भारतीय सैन्य दलाने कोरोना वॉरिअर्सवर रविवारी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत त्यांचा सन्मान केला. मात्र, बिहारमधील नालंदा मेडिकल कॉलेजच्या परिसरात हेलिकॉप्टर येऊनही पुष्पवृष्टी न झाल्याने येथील कोरोना वॉरिअर्स निराश झालेले पाहायला मिळाले. नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाऐवजी नालंदा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली होती.
सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून भलत्याच ठिकाणी पुष्पवर्षाव.. कोरोना वॉरिअर्स निराश
नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरात सैन्याचे हेलिकॉप्टर आल्यानंतर कोरोना वॉरिअर्सने अभिवादन केले. मात्र, पुष्पवृष्टी न झाल्यामुळे डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी निराश झाले होते.
नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरात सैन्याचे हेलिकॉप्टर आल्यानंतर कोरोना वॉरिअर्सने अभिवादन केले. मात्र, पुष्पवृष्टी न झाल्यामुळे डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी निराश झाले होते.
सैन्यदलातील जवानांनी कोरोना वॉरिअर्सचा सन्मान केल्यानंतर नालंदा वैद्यकीय महाविद्याल्यातील कोरोना वॉरिअर्सची निराशा कमी झाली. सैन्य दलाने कोरोना वॉरिअर्स म्हणून सन्मान करणे कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकासाठी आनंददायी होते.बिहारची राजधानी पाटणा येथील रुग्णालय कोरोना वॉरिअर्सवर देखील सैन्यदलाकडून पुष्पवर्षाव करण्यात आला.