नवी दिल्ली - लोकसभेमध्ये आज विवादीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये भाजपचे खासदार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली पहायला मिळत आहे. भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी आणि समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांच्यामध्ये तिहेरी तलाकवरुन आरोप-प्रत्यारोप झाले.
खासदार मिनाक्षी लेखी यांनी उत्तरप्रदेशात वाढत्या तिहेरी तलाक घटनांवरुन अखिलेश यादव सरकारला जबाबदार धरले. उत्तरप्रदेश राज्यात 'शरिया अदालत' चालतात. त्यामुळे तलाकच्या घटनांना प्रोत्साहन मिळते, असा आरोप लेखी यांनी केला. तिहेरी तलाक कायदा लागू करुन पंतप्रधान मोदी लोकांना त्यांचा हक्क देत आहेत, जो हक्क राजीव गांधींनी नाकारला होता, असे त्या म्हणाल्या.