नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशभर चिंतेची लाट निर्माण झाली आहे. पीआयबीच्या संचालकालाच कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
पीआयबीच्या संचालकालाच झाला कोरोना, तापेसह श्वास घेण्यास होतो त्रास - पीआयबीच्या संचालकाला कोरोनाची बाधा
कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. राजधानी दिल्लीत तर कोरोना संसर्गाचा फैलाव चांगलाच पसरत चालला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीआयबीच्या संचालकालाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीआयबीच्या संचालकाला ताप आणि श्वास घेण्यास, त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.