नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दल यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लीम आयएसआयसाठी काम करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या गुप्तचर आयएसआय संघटनेसाठी मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लीम काम करत आहेत. तर बजरंग दल आणि भारतीय जनता पक्ष आयएसआयकडून पैसे घेत आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्था बिघडवली असून देशात रोजगार नाहीत. मोदींनी सर्व गोष्टी सोडून अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.