लखनऊ-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन लागू आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे. त्यामुळे शाळा बंद असल्याने शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. मात्र, गाझियाबादमध्ये विद्यार्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी मंगळवारपासून शाळेच्या वेळेत ऑनलाईन क्लास बोलवले जाणार आहेत.
लाॅकडाऊन असतानाही सुरू झाली शाळा; विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत आॅनलाईन शिक्षण - उत्तर प्रदेश बातमी
गाझियाबाद येथील इंदिरापुरम पब्लिक स्कुलने व्हर्चुअल ऑनलाइन स्कूल सुरू केले आहेत. यात विद्यार्थांना दररोज शाळेच्या वेळेमध्ये घरीच बसून आॅनलाईन शिकवले जाणार आहे. शिक्षकही घरातच बसून शिकवणार आहेत. त्यामुळे सध्या लाॅकडाऊन असला तरी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.
गाझियाबाद येथील इंदिरापुरम पब्लिक स्कूलने व्हर्चुअल ऑनलाइन स्कूल सुरू केले आहेत. यात विद्यार्थांना दररोज शाळेच्या वेळेमध्ये घरीच बसून आॅनलाईन शिकवले जाणार आहे. शिक्षकही घरातच बसून शिकवणार आहेत. त्यामुळे सध्या लाॅकडाऊन असला तरी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.