नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहांने व्यापारी निखिल जैन यांच्यासोबत विवाह केला होता. यावेळी नुसरतने कपाळात कुंकु भरल्यामुळे आणि गळ्यात मंगळसुत्र घातले होते. हे सर्व इस्लामविरोधी असल्यामुळे देवबंदने नुसरत विरोधात फतवा काढला आहे.
कुंकु आणि मंगळसुत्र घातल्यामुळे नुसरत जहां विरोधात निघाला फतवा - साध्वी प्रज्ञा
देवबंदच्या मुस्लिम धर्मगुरुंच्या मतानुसार, नुसरत इस्लाम धर्माचे पालन करते. त्यामुळे तिने हिंदु रितीरिवाजांवर विश्वास ठेवता कामा नये.
देवबंदच्या मुस्लिम धर्मगुरुंच्या मतानुसार, नुसरत इस्लाम धर्माचे पालन करते. त्यामुळे तिने हिंदु रितीरिवाजांवर विश्वास ठेवता कामा नये. हिंदु महिलांप्रमाणे गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळात कुंकु लावण्यासारखे प्रयोग तिने करू नयेत. हे सर्व गैर इस्लामिक आहे. नुसरत अभिनेत्री आहे. यामुळे आम्ही तिच्या खासगी आयुष्यात दखल देऊ इच्छित नाही. परंतु, शरिअतमध्ये जे लिहिले आहे ते सांगणे आमचे कर्तव्य आहे.
मुस्लिम धर्मगुरुच्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा यांनी जोरदार पलटवार केला आहे. साध्वी म्हणाल्या, जर तुम्हांला फतवा काढायचाच होता तर, तीन तलाकवरती काढायचा होता. मंगळसुत्रावर फतवा काढल्यामुळे काय होणार आहे?
तुर्की येथे विवाहसमारंभ झाल्यानंतर संसदेत उपस्थित राहिलेल्या नुसरत जहां यांनी नुकतीच संसदेत खासदारकीची शपथ घेतली होती. यावेळी त्यांनी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळात कुंकु लावले होते.