उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला
माजी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण
नवी दिल्ली - माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर हा उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला होणार आहे. त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण ?
जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पीडितेच्या आईने केलाय. खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्याचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.