नवी दिल्ली -दिल्ली हिंसाचारात मृतांचा आकडा वाढून ३८झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २००पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
सर्वात जास्त हिंसा सोमवारी आणि मंगळवारी झाली. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून आज कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. संवेदनशील भागांमध्ये पोलीस 'फ्लॅग मार्च' करत आहेत. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.