नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी(5 जानेवारी) घडली. या घटनेत विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष आणि ३० ते ४० विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आयशी घोष आणि इतर 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जेएनयू हल्ला प्रकरण : आयशी घोषसह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल - जेएनयू आंदोलन न्यूज
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष आणि इतर 19 जणांविरोधात पोलिसांनी 'एफआयआर' दाखल केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई झाली.
आयशी घोष
हेही वाचा - जेएनयू हल्ला प्रकरण : आंदोलनकर्त्यांना गेट वे ऑफ इंडिया येथून हटवले
विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष आणि इतर 19 जणांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणे, विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्याच्या कारणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई झाली.