नवी दिल्ली - दिल्ली पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने शाह आलम याला ताब्यात घेतले आहे. शाह आलम हा आयबी कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात अटक झालेल्या ताहिर हुसैनचा भाऊ आहे. दिल्ली हिंसाचाराप्रकरणी पोलीस त्यांची चौकशी करत असून चांदबागमध्ये हिंसा घडवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या भावाला दिल्ली गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
दिल्ली पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने शाह आलम याला ताब्यात घेतले आहे.
दिल्ली हिंसाचार
दिल्ली हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेला 'आप'चा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनाला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कडकडडुमा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. गुरुवारी दिल्ली गुन्हे शाखेन ताहिर हुसेनला अटक केली होती. गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप ताहिर हुसेनवर आहे.
Last Updated : Mar 9, 2020, 3:15 PM IST