नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. दिल्लीमध्ये कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
दिल्लीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
संबधित पोलीस कर्मचारी लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात तैनात होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्या संपर्कात आलेल्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच तिलक विहार पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या 70 पोलीस कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशावह यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये 2 हजार 156 कोरोनाबाधित असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 611 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशभरामध्ये 15 हजार 859 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.