महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत विशेष: एबीव्हीपीचा कार्यकर्ता दिल्ली पोलिसांच्या ताफ्यात; जाणून घ्या 'व्हायरल' सत्य - delhi march fake news

दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठातील आंदोलनावेळी एबीव्हीपीचे कार्यकर्ते पोलिसांसोबत हिंसेमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे ईटीव्ही भारतने या व्हायरल फोटोमागील सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला.

delhi protest viral photo
अरविंदचा व्हायरल फोटो

By

Published : Dec 18, 2019, 1:34 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. रविवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी एका साध्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे दिल्लीतील वातावरण आणखीनच बिघडण्याची शक्यता होती. कारण हा पोलीस जवान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आरएसएसचा (एबीव्हीपी) कार्यकर्ता असल्याची माहिती पसरली होती.

एबीव्हीपीचे कार्यकर्ते पोलिसांसोबत हिंसेमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती दिल्लीमध्ये पसरली होती. त्यामुळे ईटीव्ही भारतने या व्हायरल फोटोमागील सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरला झाला होता, त्याच्याशी ईटीव्ही भारतने चर्चा केली. तेव्हा ही अफवा पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

साध्या वेषातील ज्या कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता तो पोलीस दलातील जवान असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पोलीस जवानाचे नाव अरविंद असून तो दक्षिण पूर्व दिल्लीमधील एका पोलीस ठाण्यात तैनात आहे. त्या दिवशी कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी अरविंद साध्या वेषामध्ये होते. अरविंद या पोलीस जवानाचे नाव भरत शर्मा आहे असे लिहून एक व्हिडिओ व्हायरल केला जात होता. भरत शर्मा एबीव्हीपीचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचे संबध असल्याचे पसरवले जात होते. त्यामुळे आंदोलकांमध्ये आणखी असंतोष पसरण्याची शक्यता होती.

दिल्ली पोलीसमध्ये बारा वर्ष काम करत असून भरत शर्मा नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे अरविंद यांनी सांगितले. दिल्ली आंदोलनासंबंधी अनेक खोटे व्हिडिओ आणि फोटा व्हायरल करण्यात आले. मात्र, त्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसातील जवान अरविंद याच्याशी ईटीव्ही भारतने चर्चा केली
हिंसक आंदोलनावेळी अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
जामीया विद्यापीठातील हिंसक आंदोलनावेळी अनेक खोटे व्हिडिओ आणि फोटा व्हायरल करण्यात आले. अशा व्हिडिओंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन डीसीपी चिन्मय विशाल यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था शाबूत ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details