नवी दिल्ली - दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पंजाब, हरियाणा आणि दिल्ली सरकारला फटकारले आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एका खंडपीठासमोर वायू प्रदूषणाच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला दिल्ली, पंजाब आणि हरियाणाचे मुख्य सचिवही उपस्थित आहेत.
जर तुम्हाला दिल्लीमधील रस्त्यांवरची धूळ, बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करता येत नसेल, तर तुम्ही या पदावर का आहात? असा कडक प्रश्न न्यायमूर्ती मिश्रा यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना विचारला. मिश्रा पुढे म्हणाले की, विकासासाठी जागतिक बँकेकडून येणारा निधी कुठे जात आहे? मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही दिल्लीच्या रस्त्यांची दुरवस्था का आहे?