नवी दिल्ली - ईदचा सण फक्त दोन दिवसांवर आला असताना दि इंडियन मुस्लिम्स फॉर प्रोग्रेस अॅण्ड रिफॉर्म्स (आयएमपीएआर) या दिल्लीतील एका मुस्लीम वैचारिक मंडळाने मुस्लीम बांधवांना देशवासियांप्रती संवेदनशील राहण्याचे आवाहन केले आहे. खुल्या रस्त्यावर किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी 'कुर्बानी' हा मुस्लीम समाजातील पशूबळी देण्याचा विधी न करण्याची विनंती या मंडळाने मुस्लीम समुदायाला केली आहे.
दिल्लीतील मुस्लीम वैचारिक मंडळाकडून ईदपूर्वी संवेदनशीलतेचे आवाहन - ईद कुर्बानी न्यूज
ईदचा सण फक्त दोन दिवसांवर आला असताना दि इंडियन मुस्लिम्स फॉर प्रोग्रेस अॅण्ड रिफॉर्म्स (आयएमपीएआर) या दिल्लीतील एका मुस्लीम वैचारिक मंडळाने मुस्लीम बांधवांना खुल्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी 'कुर्बानी' हा मुस्लीम समाजातील पशूबळी देण्याचा विधी न करण्याची विनंती केली आहे.
5 ऑगस्ट 2020 रोजी, अयोध्येत रामजन्मभूमीचे भूमिपूजन केले जाईल. याआधी या मुस्लीम मंडळाकडून करण्यात आलेल्या आवाहनातून परिपक्वतेचा संदेश मिळत आहे. तसेच, ‘सर्व भारतीयांनी जाती-धर्म बाजूला ठेऊन एकत्र यावे. या दिवशी देशाच्या शांती आणि समृद्धीसाठी आणि कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी प्रार्थना करावी,’ असे या वैचारिक मंडळाने म्हटले आहे. कोविड-19 नंतरची स्थितीही आव्हानात्मक असणार आहे. सर्वांनी परिस्थितीचा एकजुटीने सामना करावा, असेही मंडळातर्फे पुढे सांगण्यात आले आहे.