नवी दिल्ली - दिल्ली सरकारने आता तरुणांना नोकरी मिळविणे सोपे केले आहे. यासाठी सरकारने एक खास वेबसाइट सुरू केली आहे. रोजगार बाजार असे या वेबसाइटचे नाव आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जुलै महिन्यात ही वेबसाइट लाँच केली आहे. या रोजगार बाजार असे या पोर्टलला नाव देण्यात आले आहे. या पोर्टलवर किमान 10 लाख नोकऱ्या रिक्त होत्या. अद्याप या पोर्टलवर नऊ लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत.
दिल्ली जॉब पोर्टलः आतापर्यंत १० लाख नोकऱ्याची ऑफर, सध्या 9 लाख जागा रिक्त - दिल्ली जॉब पोर्टल
दिल्ली सरकारने आता तरुणांना नोकरी मिळविणे सोपे केले आहे. यासाठी सरकारने एक खास वेबसाइट सुरू केली आहे. रोजगार बाजार असे या वेबसाइटचे नाव आहे. या पोर्टलवर किमान 10 लाख नोकऱ्या रिक्त होत्या. अद्याप या पोर्टलवर नऊ लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत.
नकली प्रमाणपत्र आणि पदव्यामुळे जवळपास 3.5 लाख नोकरी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स, अँमझान एचडीएफसी बँक, आसाम टी या कंपन्यांनी पोर्टलच्या माध्यमातून नोकरीची ऑफर दिली आहे. पोर्टलवर उर्वरित नऊ लाख रिक्त जागांसाठी 8 लाखाहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत.
कोरोना साथीने अनेकांना बेरोजगार केले गेले. लॉकडाऊनमुळे कंपन्यांना कामगार नसल्याने संकटाचा सामना करावा लागला. आपने जॉब पोर्टल 'रोजगार बाजार' हे सुरू केल्याने नोकरी शोधणार्या आणि कंपन्यांच्या नवीन कर्मचाऱयांची भरती करता येईल . यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यास मदत होईल, असे आपचे आमदार महेंद्र गोयल म्हणाले.