महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रवाशांच्या तिकीटांचे पैसे परत द्या; दिल्ली उच्च न्यायालयाचे 'जेट'ला आदेश

त्यासंदर्भातले उत्तर दिल्ली उच्च न्यायालयाने डीजीसीए आणि नागरी उड्डान मंत्रालयाकडे मागितले आहे. तसेच पुढील सुनावणी १६ जुलैला होणार आहे.

नवी दिल्ली

By

Published : May 1, 2019, 4:13 PM IST

नवी दिल्ली - कर्ज न मिळाल्यामुळे बंद झालेल्या जेट एअरवेजच्या प्रवाशांच्या आरक्षित तिकीटांचे पूर्ण पैसे परत करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने जेट एअरवेजला दिले आहेत. तसेच त्यासंदर्भातले उत्तर दिल्ली उच्च न्यायालयाने डीजीसीए आणि नागरी उड्डान मंत्रालयाकडे मागितले आहे. तसेच पुढील सुनावणी १६ जुलैला होणार आहे.

जेट एअरवेजच्या प्रकरणानंतर जेटच्या वैमानिकांसह अनेक कर्मचाऱयांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर जेट एअरवेजमध्ये तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना त्यांचे पैसै परत मिळणार की नाही याची खात्री नव्हती. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details