नवी दिल्ली- आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यांना अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाही झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर; न्यूमोनियाचे झाले निदान
15:16 June 19
सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर; न्यूमोनियाचे झाले निदान
मंगळवारी जैन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर बुधवारी पुन्हा त्यांची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. ताप आणि श्वसनास अडथळे येत असल्यामुळे सोमवारीच त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, दिल्लीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे मनीष सिसोदिया आज दिल्लीतील आयसीयू बेड्स वाढवण्यासंबंधी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीला सत्येंद्र जैनही उपस्थित असणार आहेत. रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या बैठकीला आपली उपस्थिती दर्शवतील.
हेही वाचा :भारत-चीन सीमा वाद: चीनच्या ताब्यातील 10 भारतीय जवानांची सुटका