नवी दिल्ली - राजधानीमध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले असून हे तीन रुग्ण ३३७ नागरिकांच्या संपर्कात आले आहेत. या सर्वांना प्रशासनाने देखरेखीखाली ठेवले आहे. तीन बाधित सोडून एक कोरोना संशयितही आरोग्य विभागाला आढळून आला आहे. या सर्वांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
हेही वाचा -केरळमध्ये कोरोनाचे आणखी ५ रुग्ण आढळले; देशभरात ३९ जणांना लागण
पहिला रुग्ण १०५ नागरिकाच्या, दुसरा १६८ नागरिकांच्या संपर्कात, तर तिसरा व्यक्ती ६४ जणांच्या संपर्कात आला होता. दिल्ली आरोग्य विभागाने या सर्वांना देखरेखीखाली ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा -देशभरात कोरोनाचे आतापर्यंत ३४ रुग्ण, पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
भारतामध्ये आत्तापर्यंत ३९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. विविध राज्यांनी संभाव्य धोका ओळखून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याबाबत नियमावली जारी केली आहे. काल पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध विभागांची एकत्रित आढावा बैठक घेतली.