महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली सरकार ऑटो रिक्षाचालकांसह कॅबचालंकाना प्रत्येकी 5 हजार देणार - नवी दिल्ली कोरोना संसर्ग

ऑटो रिक्षा, ट्रक्सी, ग्रामीण सेवा, मॅक्सी कॅब, इको फ्रेंडली सेवा, इ रिक्षा, आणि स्कूल कॅब चालकांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.

arvind kejriwal
अरविंद केजरीवाल

By

Published : Apr 11, 2020, 8:37 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

नवी दिल्ली- भारतात कोरोना विषाणूच्या प्रसाराला नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतरही संचारबंदी लागू राहण्याची शक्यता आहे. या काळात सर्व देश थांबला आहे. या कठीण काळात दिल्ली सरकार टॅक्सी चालक आणि कॅब चालकांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

ऑटो रिक्षा, ट्रक्सी, ग्रामीण सेवा, मॅक्सी कॅब, इको फ्रेंडली सेवा, इ रिक्षा, आणि स्कूल कॅब चालकांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. ही आर्थिक मदत मिळण्यासाठी वाहन चालाकांना अर्ज करावा लागणार आहे, ही प्रक्रिया 13 एप्रिलपासून सुरू होणार आहे. संचारबंदी काळात वाहन चालकांच्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारने याआधी मजूरांनाही आर्थिक मदत केली आहे.

देशामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 447 रुग्ण आढळून आले आहेत. तर 642 जण पूर्णत बरे झाले आहेत. मागील 24 तासात देशात 1 हजार 35 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 239 रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती आरोगय मंत्रालयाने दिली आहे.

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details