नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळली आहे. मुकेश याची दया याचिका आज (गुरुवार) गृहमंत्रालयाकडे दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देत गृहमंत्रालयाने ही दया याचिका फेटाळली आहे.
निर्भया प्रकरण : दिल्ली सरकारने आरोपी मुकेश सिंहची दया याचिका फेटाळली! - निर्भया आरोपी फाशी
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळली आहे. मुकेश याची दया याचिका आज (गुरूवार) गृहमंत्रालयाकडे दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देत गृहमंत्रालयाने ही दया याचिका फेटाळली आहे.
निर्भया प्रकरण : आरोपी मुकेश सिंहची दया याचिका दिल्ली सरकारने फेटाळली!
निर्भया प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर आरोपी मुकेश सिंहने दाखल केलेल्या दयेच्या अर्जामुळे ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, दिल्ली न्यायालयानेया आरोपींच्या फाशीसंदर्भातील तयारीचा अहवाल १७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश तिहार तुरूंग प्रशासनाला दिले आहेत.