महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कन्हैया कुमारवर  चालणार देशद्रोहाचा खटला.. दिल्ली सरकारची परवानगी - case against Kanhaiya Kumar

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) नेते कन्हैया कुमारवर केजरीवाल सरकारने देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याची माहिती आहे.

कन्हैया कुमार
कन्हैया कुमार

By

Published : Feb 28, 2020, 7:36 PM IST

Updated : Feb 28, 2020, 8:57 PM IST

नवी दिल्ली - केजरीवाल सरकारने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) नेते कन्हैया कुमारवरसह अन्य दोघांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. स्पेशल सेलने दिल्ली सरकारला यासंबधी मंजूरी मागितली होती. याप्रकरणी कन्हैया कुमारसह उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर खटला दाखल करण्यात येणार आहे.

14 जानेवरीला दिल्ली पोलिसांनी सीआरपीसी 173(2) कलमाअंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी 10 जानेवरीला स्पेशल सेलने दिल्ली सरकारकडे कन्हैयावर देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी परवानगी मागितली होती. याप्रकरणी गृह विभागाने पुरावेही दाखल केले होते.

देशद्रोह प्रकरणी आरोपपत्र दाखल करताना राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागते. याच्या मंजुरीची फाईल दिल्ली सरकारकडे पाठवण्यात आली होती. दरम्यान गेल्या 1 वर्षापासून हे प्रकरण हे प्रलंबीत ठेवल्यामुळे भाजपकडून आपवर टीकाही करण्यात आली होती.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील एका कार्यक्रमामध्ये ९ फेब्रुवारी २०१६ ला कन्हैया कुमारने कथित देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. संसद हल्ल्यातील सूत्रधार अफजल गुरू याच्या फाशीविरोधात हा कार्यक्रम घेण्यात आला. जेएनयूत झालेल्या या कार्यक्रमातील गोंधळाचे पडसाद देशभरात उमटले होते.

Last Updated : Feb 28, 2020, 8:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details