नवी दिल्ली - दिल्लीमधील धान्य बाजार येथील एका कंपनीला लागलेल्या आगीप्रकरणी इमारतीचा मालक रेहान याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आगीत सापडून तब्बल ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या मालकाविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मृतांमधील २८ जणांची ओळख पटली आहे. इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दिल्ली अग्नितांडव: २८ मृतांची ओळख पटली, इमारतीचा मालक, मॅनेजरही अटकेत
दिल्लीमधील धान्य बाजार येथील फॅक्ट्रीला लागलेल्या आगीप्रकरणी इमारतीचा मालक रेहान याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एलएनजेपी रुग्णालयातील २८ मृतांची ओळख पटवण्यात आली आहे.
दिल्ली आग
इमारतीचा मॅनेजर फुरकान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कलमाअंतर्गत दोषी ठरल्यानंतर आरोपींना १० वर्ष तुरुंग किंवा आजीवन कारावास होऊ शकतो.
दरम्यान, एलएनजेपी रुग्णालयातील २८ मृतांची ओळख पटविण्यात आली आहे. यातील २१ जण बिहारमधील आहेत. तर ३ जण उत्तरप्रदेशातील आहेत. ४ जणांची नावे समजली असून त्याचा पत्ता समजला नाही.
ओळख पटलेल्या मृतांची नावे आणि माहिती