नवी दिल्ली -ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४६ झाला आहे. गुरु तेज बहादूर रुग्णालयात ३८ जणांचा, लोक नायक रुग्णालयात ३ जणांचा, जग प्रवेश चंदार रुग्णालयात १ जणांचा तर राम मनोहर लोहिया रुग्णालयात ४ जणांचा मत्यू झाला आहे. तर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी सकाळी दोन संशयीत दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघेही कंगलिपक कम्युनिस्ट पार्टीचे (केसीपी) सदस्य आहेत.
दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 46 वर; 254 गुन्हे दाखल, तर 903 जणांना घेतले ताब्यात - Death toll rises to 46
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४६ झाला आहे. पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत 254 गुन्हे दाखल केले आहेत तर, 903 जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत 254 गुन्हे दाखल केले आहेत तर, 903 जणांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आली असली तरी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. अवैध शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.
दरम्यान परिसरामध्ये शांतता आहे. हिंसाचारानंतर पोलीस सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच शाहीन बाग परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आहे.