नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर.. 8 फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला निकाल
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये शारीरिक किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे गैरहजर असणाऱ्या मतदारांसाठी विशेष सोय केली जाणार आहे. अपंग आणि 80 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे.