महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 13, 2019, 8:42 PM IST

Updated : Nov 13, 2019, 8:49 PM IST

ETV Bharat / bharat

दिल्ली प्रदूषण : शाळा आणि मोठे उद्योग राहणार बंद!

आज (बुधवारी) दिल्लीतील एअर क्लालिटी इंडेक्स (एआयक्यु) म्हणजेच हवेचा निर्देशांक ४५७ अंकावर पोहचला होता. त्यामुळे, पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने राजधानीमधील शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.

Delhi Air Pollution update

नवी दिल्ली- दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे हवेचा स्तर पुन्हा खालावला आहे. त्यामुळे, पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने राजधानीमधील शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. यासोबतच, कोळसा आणि इतर इंधन वापरणारे उद्योगही १५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात यावे असाही प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने तो मान्य करत, दिल्लीतील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, आज (बुधवारी) दिल्लीतील एअर क्लालिटी इंडेक्स (एआयक्यु) म्हणजेच हवेचा निर्देशांक ४५७ अंकावर पोहचला होता. मागील आठवड्य़ात दिल्लीकरांना प्रदूषणापासून थोडी उसंत मिळाली होती. मात्र, पुन्हा पाऊस आणि दमट हवामानामुळे हवेचा स्तर बिघडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे, दिल्लीकर पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत.

हेही वाचा : सावधान! दिल्लीतील प्रदुषण पुन्हा धोकादायक स्तरावर, लोधी रोडवरील हवा सर्वात जास्त विषारी

Last Updated : Nov 13, 2019, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details