श्रीनगर - विरोधी पक्षनेत्यांचे शिष्ठमंडळ काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीनगरकडे रवाना झाले आहे. या शिष्ठमंडळामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, डी. राजा, शरद यादव, माजिद मेमन, मनोज झा यांचा समावेश आहे. सध्या ते विमानामध्ये असून काही वेळात काश्मीरमध्ये पोहचतील.
राहुल गांधीसह विरोधी पक्षनेत्यांचे शिष्ठमंडळ काश्मीरकडे रवाना
विरोधी पक्षनेत्यांचे शिष्ठमंडळ काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीनगरकडे रवाना झाले आहे.
राहुल गांधी
जम्मू काश्मीर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव विरोधी पक्षांच्या नेत्यांनी येवू नये असे म्हटले होते. मात्र, आता विरोधी पक्षाचे नेते काश्मीरकडे रवाना झाले आहे. सहकार्य करण्याचे आवाहन विरोधी पक्षांना जम्मू प्रशासनाने केले आहे. श्रीनगरला भेट दिल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे भेट देऊ नका, असे काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे.