नवी दिल्ली -संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तावर हल्लाबोल केला आहे. काश्मीर तुमचा कधी होता? ज्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात राहता, असा टोला राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला लगावला. लडाखमधील 26 व्या किसान-जवान विज्ञान मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
'काश्मीर तुमचा कधी होता? ज्यासाठी तुमचे नेहमीच रडगाणे सुरू असते' राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तावर हल्लाबोल केला आहे. काश्मीर तुमचे कधी होते जे नेहमी त्याच्यासाठी रडत राहता, असा टोला राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला लगावला.
राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर असून त्यांनी आज 26 व्या किसान-जवान विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी काश्मीर मुद्यावरून त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. 'काश्मीर तुमचा कधी होता. जे त्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडत असता. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून तुमच्या अस्तित्वाचा आम्ही सन्मान करतो. पाकिस्ताला या प्रकरणी दखल देण्याची काही गरज नाही. काश्मीर आमचा आहे. यात कोणतीच शंका नाही. पाक व्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान हे पाकिस्ताने अवैधरित्या गिळंकृत केले आहेत', असे राजनाथ सिंह म्हणाले.
यापुर्वी देखील राजनाथ सिंह यांनी पाकिस्ताला दहशतवादाला पाठपुरावा करण्यासाठी बजावले होते. पाकिस्तानशी फक्त आतंकवादावरच चर्चा होईल. त्याशिवाय इतर कोणत्याच मुद्दयावर चर्चा होणार नाही. जर त्यांना आमच्याशी चर्चा करायची आहे. तर त्यांनी दहशतवादाला खतपाणी देणे बंद करावे, असे राजनाथ यांनी म्हटले होते.