महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 27, 2020, 3:50 PM IST

ETV Bharat / bharat

एनसीसी छात्रांच्या सरावासाठी संरक्षण मंत्रालयानं सुरू केले अ‌ॅप

प्रशिक्षणासाठी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अ‌ॅपचे नाव "DGNCC" असे आहे. यामध्ये प्रशिक्षणासाठीचे साहित्य आणि अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून विचारल्या जाणाऱ्या विविध प्रशांची उत्तरे एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यात आली आहेत.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्यापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजेच एनसीसी छात्रांचे प्रशिक्षण बंद आहे. त्यावर उपाय म्हणून संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी छात्रांना प्रशिक्षणात सहाय्य करण्यासाठी मोबाईल अ‌ॅपलिकेशन लॉन्च केले आहे.

राजनाथ सिंह

'कोरोनाच्या प्रसारानंतर लागू केलेल्या निर्बंधामुळे एनसीसी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर आणि सरावावर परिणाम झाला आहे. कारण प्रशिक्षण देताना एकमेकांशी जवळून संबध येतो. येत्या काही दिवसांत शाळा महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता कमी आहे. अशा काळात एनसीसी छात्रांना डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण देण्यात द्यायला पाहिजे, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रशिक्षणासाठी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अ‌ॅपचे नाव "DGNCC" असे आहे. यामध्ये प्रशिक्षणाचे व्हिडिओ आणि अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून विचारल्या जाणाऱ्या विविध प्रशांची उत्तरे एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यात आली आहेत.

सरावात काही अडचण असल्यास छात्र अ‌ॅपद्वारे तज्ज्ञ प्रशिक्षकांना प्रश्नही विचारू शकणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसी महासंचालक राजीव चोप्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उद्धाटनावेळी उपस्थित होते. डिजिटल शिक्षणाद्वारे छात्रांना सराव करण्यास मदत होणार असल्याचे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details