महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'दीपिका पदूकोण ही तुकडे-तुकडे गँगची सदस्य' - BJP MP Sakshi Maharaj on Deepika

आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. दीपिका पदूकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य आहे, असे विधान त्यांनी केले.

दीपिका पदूकोण
दीपिका पदूकोण

By

Published : Jan 8, 2020, 8:27 PM IST

नवी दिल्ली -आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. दीपिका पदूकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य आहे, असे विधान त्यांनी केले. जेएनयूमध्ये हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण मंगळवारी विद्यापीठात पोहोचली होती. त्यावरून त्यांनी दीपिकावर टीका केली.

दीपिकाच्या जेएनयू भेटीसंदर्भात उन्नावचे खासदार असलेले साक्षी महाराज यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दीपिका पदूकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य असून या सर्वांमागे काही परदेशी शक्तींचा पाठींबा आहे, असे साक्षी महाराज म्हणाले.

दीपिका जेएनयूबाहेरील मोर्चात सहभागी झाली होती.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दीपिका जेएनयूबाहेरील मोर्चात सहभागी झाली होती. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिची भेट घेत विचारपूस केली. मात्र, यावेळी दीपिकाने कोणतंही भाषण किंवा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. पूर्णवेळ दीपिका शांत उभी होती.

ABOUT THE AUTHOR

...view details