महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विशेष चर्चा : 'डिकोडिंग कमला हॅरिस', महासत्तेच्या निवडणुकीतील भारतीय मतांचा प्रभाव

मागील आठवड्यात डेमोक्रेटिक पार्टीच्या 'व्हर्च्युअल' अधिवेशनात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटीक पार्टीतर्फे जो बिडन यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्याचसोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाली. या पदावर निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय-आशियाई वंशाच्या कृष्णवर्णीय स्थलांतरीत महिला उमेदवार आहेत. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'च्या पत्रकार स्मिता शर्मा यांनी अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत मीरा शंकर आणि वॉशिंग्टन डीसी येथील 'द हिंदू' या वृत्तपत्राचे अमेरिका प्रतिनिधी श्रीराम लक्ष्मण यांच्याशी हॅरिस यांच्या उमेदवारीबद्दल विविध पैलूंविषयी चर्चा केली.

US election
विशेष चर्चा : 'डिकोडिंग कमला हॅरिस', महासत्तेच्या निवडणुकीतील भारतीय मतांचा प्रभाव

By

Published : Aug 24, 2020, 1:57 PM IST

Updated : Aug 24, 2020, 5:12 PM IST

हैदराबाद - मागील आठवड्यात डेमोक्रेटिक पार्टीच्या 'व्हर्च्युअल' अधिवेशनात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटीक पार्टीतर्फे जो बिडन यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्याचसोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाली. या पदावर निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय-आशियाई वंशाच्या कृष्णवर्णीय स्थलांतरीत महिला उमेदवार आहेत. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'च्या पत्रकार स्मिता शर्मा यांनी अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत मीरा शंकर आणि वॉशिंग्टन डीसी येथील 'द हिंदू' या वृत्तपत्राचे अमेरिका प्रतिनिधी श्रीराम लक्ष्मण यांच्याशी हॅरिस यांच्या उमेदवारीबद्दल विविध पैलूंविषयी चर्चा केली. भारतीय मतांचा अमेरिकेच्या निवडणुकीतील महत्त्व तसेच अन्य मुद्यांचा उहापोह या चर्चेदरम्यान करण्यात आला आहे.

विशेष चर्चा : 'डिकोडिंग कमला हॅरिस', महासत्तेच्या निवडणुकीतील भारतीय मतांचा प्रभाव

गेल्या आठवड्यात झालेल्या 'व्हर्च्युअल डेमोक्रॅटिक नॅशनल कॉन्व्हेन्शन' या अधिवेशनात डेमोक्रेटिक पार्टीतर्फे राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बीडन यांची उमेदवारपदी, तर उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस यांची अधिकृत उमेदवारी घोषित झाली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोघेही विरोधी पक्षाकडून नशीब आजमावणार आहेत.

उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीसाठी नामांकित करण्यात आलेल्या हॅरिस या पहिल्या अमेरिकी आशियाई कृष्णवर्णीय महिला आहेत. प्रथम इंडो-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन स्थलांतरित म्हणून त्यांची निवड झाली आहे. या सर्व घडामोडींचा नक्की काय अर्थ काढण्यात येतोय?, याचा आढावा घेण्यात आलाय.

ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी ‘बॅटलग्राउंड यूएसए २०२०’ च्या विविध बाबींवर उजेड टाकण्याचा प्रयत्न केला. या संभाषणांच्या मालिकेत पहिल्यांदा माजी भारतीय राजदूत मीरा शंकर आणि वॉशिंग्टन डीसी येथील 'द हिंदू'चे वार्ताहर श्रीराम लक्ष्मण यांच्याशी चर्चा केली.

विशेष चर्चा : 'डिकोडिंग कमला हॅरिस', महासत्तेच्या निवडणुकीतील भारतीय मतांचा प्रभाव

श्रीराम लक्ष्मण यांनी बराक ओबामा यांच्या कार्यकाळात स्वत: उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलेल्या अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांना हॅरिस यांनी का निवडले गेले आहे, याबद्दल मत मांडले.

कमला हॅरिस यांची सार्वजनिक पार्श्वभूमी खूप मजबूत आहे. कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून अनेक दशके काम केले आहे. त्या स्वत: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या. तसेच, त्यांची बहु-वांशिक पार्श्वभूमी आहे. कृष्णवर्णीय मतदारांना, दक्षिण आशियाई मतदारांना आवाहन करण्यात आले आहे, की ती एक महिला आहे. या कारणास्तव निवडणुकीची समीकरणे पाहता त्यांना नक्कीच मतदान होईल.

परंतु हॅरिस यांच्यामुळे बिडेन यांचा खरोखरच विस्तार व्हावा, ही आशादायक बाब आहे. जो बिडेनपेक्षा त्या वयाने वीस वर्षांनी लहान आहेत. या दोघांची जोडी पुढील चार-आठ वर्षे किंवा त्यापुढील काळातील भविष्य दर्शवते, असे श्रीराम लक्ष्मण म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत वर्ण हा मोठा मुद्दा ठरणार आहे. जॉर्ज फ्लुएडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णभेदाचा पुन्हा भडका उडाला. त्यामुळे कृष्णवर्णीयांबद्दची आपुलकी वाढली आहे. कृष्णवर्णीयांमध्ये कालानुरुप झालेले मतांचे विभाजन यंदा निवडणुकीत दिसण्याची शक्यता कमी आहे. यापुढे जाऊन यंदा अमेरिकन नागरिक तत्वे आणि धोरणांचाही विचार करतील, असे मत मीरा शंकर यांनी मांडले.

संख्येने जास्त असूनही अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांकडून भारतीय-अमेरिकन समुदायाला कमी लेखण्यात आले आहे. असे विचारल्यानंतर आशियाई वंशाच्या लोकांची संख्या खरोखर मोठी नसली तरीही आज अमेरिकन समाजात अतिशय सक्रिय राजकीय आणि आर्थिक व्यक्तिरेखा या आशियाई असल्याचे शंकर म्हणाल्या.

ही इतकी मोठी व्होट बँक नाही. आशियाई लोक एकत्रितपणे एकूण मतदारांच्या 4.7 टक्के आहेत. हिस्पॅनिक हे सर्वात मोठे अल्पसंख्याक असतील, आणि ते 13 टक्के आणि ब्लॅक 12 टक्क्यांहून अधिक असतील. तर संख्येच्या दृष्टीने ते तितकेसे महत्वाचे नाही. परंतु, या निवडणुकांमध्ये स्विंग स्टेट्स खूप महत्वाची ठरणार आहे. जिथे प्रत्येक मतमोजणी होणार आहे. काही स्विंग राज्यांमध्ये भारतीय-अमेरिकन समुदाय एक किंवा अन्य मार्गाने मतदान वळवण्यासाठी प्रभावित करू शकतो, असे मत मीरा शंकर यांनी सांगितले.

हा समुदाय एक श्रीमंत समुदाय आहे, आणि त्यांना राजकारणामध्ये अधिक सक्रिय राहण्याची इच्छा आहे. म्हणूनच ते अलीकडच्या काळात 'राजकीय फंडिंग' मध्ये अधिक रूची घेत आहेत. प्रत्येकजण- डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन दोघेही एक निवडणूक लढवण्याच्या आश्वासनासाठी जेवढे पैसे मिळतील, तेवढी रक्कम लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व कारणास्तव भारतीय-अमेरिकन समुदायाची सर्व बाजूंनी ओरड होत आहे. अमेरिकेच्या आर्थिक क्षेत्रातही आता इंडो-अमेरिकन लोक त्यांच्या काही अत्यंत प्रतिष्ठित कंपन्यांचे प्रमुख आहेत. ते गूगल असो. मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, मास्टरकार्ड. पूर्वी तो पेप्सिको होता. या फक्त छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कंपन्या नाहीत. या अमेरिकेच्या मोठ्या संस्था आहेत, माजी राजदून म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, डेमोक्रॅट्सनी कायमच मानवाधिकारांना अधिक महत्त्व दिले आहे. काही मुद्यांपासून भारत देखील बॅकफूटवर गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मूळ हितसंबंधांना दोन्ही देशांनी कधीच धक्का लागू दिला नाही.

Last Updated : Aug 24, 2020, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details